प्रधानमंत्री कौशल्य विकास योजेनेंतर्गत प्रशिक्षण अभिमान





प्रधानमंत्री कौशल्य विकास योजेनेंतर्गत
छत्रपती राजाराम महाराज उद्योजगता व कौशल्य विकास अभिमान .
गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण महाअभिमान .
संघटित व्हा , गटशेती करा
गावं: शेटपळ ता : करमाळा जि: सोलापूर
सत्कारमूर्ती: कृषिरत्न श्री.आनंद कोठडीया
कृषितज्ञ श्री. सुरेश पेनूरकार
कृषितज्ञ श्री. संदीप जगताप (Msc Agri)
कृषितज्ञ श्री. मनोज शाह (Msc Agri)

प्रगतशील बागायदार श्री .डॉ.कानगुडे
आदि उपस्तीत होते

शेतात काय पिकते यापेक्षा बाजारात काय खपते याचे ज्ञान अन कौशल्य संपादन केली तरच शेती आर्थिकदृष्टया समृद्धी देते.यासाठी शेतकऱ्यांच्या मेंदूची मशागत महत्वाची आहे .याच कामासाठी दैनिक अग्रोवनद्वारे पंतप्रधान कौशल्य विकास अभियान राज्यात राबवले जात आहे हे खूप प्रभावी व परिणामकारक आहे" असे उदगार कृषीरत्न श्री.आनंद कोठडीया यांनी शेटफळ येथे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा उदघाटन करताना काढले .
दै .अग्रोवन हे चालते बोलते कृषी विद्यापीठ आहे असे सांगून श्री.आनंद कोठडीया म्हणाले की राज्य शासनाने हे काम फक्त अग्रोवनकडे दिले हे विश्वासदर्शक आहे "
यावेळी श्री.मनोज शाह,संदीप जगताप, पुणे ,नर्सरीतज्ञ श्री.सुरेश पेनूरकर व उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सर्जेराव तळेकर यांचे मार्गदर्शन झाले .सरपंच सौ .पोळताई आवर्जून उपस्थित होत्या.
अग्रोवनचे प्रतिनिधी श्री.ताकमोघे, श्री.पवार यांनी तीन दिवस चालणाऱ्या कार्येशाळेचे स्वरूप व माहिती दिली.
सूत्रसंचलन दै .सकाळचे वार्ताहर व लोकविकास फार्मर्स प्रोडुसर्स कंपनीचे श्री गजेंद्र पोळ यांनी केले.
शेटफळ ,चिखलठाण, जेऊर ,केंडगाव, पोफळज ,उमरड, येथील ,२०० शेतकरी सहभागी झालेले आहेत.







No comments:

Post a Comment

Great Visit With Chairman Prakash Patil

Prakash Patil. Tungat.. Pandharpur with Welcoming AGRI Expert Man oj Shaha