सेंद्रिय शेती.. निखील चौगुले






नमस्कार मित्रानो
माझ नाव निखील महादेव चौगुले
मला आज एका महत्वाच्या विषयावर बोलाव अस वाटते.
तो म्हणजे शेती
   आपण रोज नव नवीन शोध लागलेलं बघतच असतो. त्याचप्रमाणे शेती मध्ये सुधा खूप सुधारणा   झलेल बघतो. या वाढत्या 4G च्या जमान्यात मानस सुधा तशीच झालीयेत. प्रत्येकाला कोणती पण गोष्ट लगेच हवी आहे. ते नवीन वस्तू असो व काही खाण्याच्या पदार्थ असोत सगळ काही कमी वेळात पाहिजे.
      अहो याचे दुष्परिणाम सुधा तसेच आहेत. या शेती च सुधा तसेच काही झालेलं आहे. ते कस बघा एखाद पिक लावल तर ते लगेच याव व लगेच ते विकल जाव आणि त्याचे पैसे पण लगेच भेटाव अस प्रत्येक शेतार्याला वाटते, यासाठी मोठ्या प्रमाणात वाढत चालेलं रासयनिक खताचं प्रमाण (CHEMICAL) जेवढ काही आपण पालेभाज्या फळ खातो त्यावरी काही न काही फवारणी केलेली असते किंवा रासायनिक खत वापरलेली असतात. याचा दुष्परिणाम खाणार्या प्रत्येकावर होत असतो. या पासून मोठे व बरे न होणारे कॅन्सर,सारखे आजार सुद्धा होऊ होतात.
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होऊ लागला. शेती उत्पन्नात घट आणि शेती उत्पादन खर्च वाढू लागला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. शेतक-यांनी स्वत:च्या तसेच राष्ट्राच्या हिताचा विचार करून सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आणि सर्वांच्या फायद्याचे आहे. भारतीय शेती ही भारतीय लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारत देशाचा आत्मा आहे, असे महात्मा गांधींनी सांगितले होते. सध्या शेतीक्षेत्रावरील वाढता भार, रासायनिक खतांचा होणारा अतिरेकी वापर आणि कमी होत जाणारी शेतीची उत्पादकता यामुळे शेत जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ‘सेंद्रीय शेती’ पद्धतीचा अवलंब करणे होय.
      ‘सेंद्रीय शेती’ पद्धतीचा विचार केला तर ‘सेंद्रीय शेती’ ही मूलभूत गरजांवर आधारित आहे. त्यासाठी सेंद्रीय शेती पद्धत शेतीप्रधान देशातील प्रत्येक शेतक-याने  समजून घेऊन तिची अंमलबजावणी केली पाहिजे. नवीन बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन देशात १९६६ नंतर हरित क्रांतीचे वारे जोराने वाहू लागले. तरी, त्यामध्ये सातत्य टिकविता आले नाही. याचा परिणाम शेतकरी आत्महत्या करू लागले. आजही शेतक-यांच्या आत्महत्या शासनाला थांबवता आल्या नाहीत हे शासनाचे अपयश म्हणावे लागेल. शेतक-यांच्या संपामुळे दीड लाखाची कर्जमुक्ती मिळाली मात्र यातून खरे शेतकरी कर्जमुक्त होणार का, हा खरा प्रश्न आहे. याला कोकणातील शेतकरी अपवाद आहेत. कारण कोकणातील शेतकरी प्रामाणिक आहेत. त्यांच्यामध्ये समयसूचकता असते. म्हणून तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत नाही.

सध्या शेती उत्पादनावरील दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. जमिनीचा कस कमी होत चालला आहे. पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महागडे सावकारी कर्ज व बँकांकडून घेतलेले कर्ज, कमी उत्पादनामुळे कर्जाची परतफेड आणि घरखर्च चालविणे शेतक-यांना अशक्य झाले आहे. त्यात दलालदादांच्या चक्रवाढ व्याजामुळे शेतकरी आत्महत्या करू लागले.
आज शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा अवलंब करण्याची गरज नाही. त्यापेक्षा शेतीची सेंद्रीय पद्धतीने कशी लागवड करता येईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. केवळ शेतीविषयी माहिती देण्याचे काम शेतीदूत करीत असतील तर समाधान आहे. मात्र शेतक-यांबरोबर फोटो काढून वर्तमानपत्रांत प्रसिद्धी मिळविण्याचे काम न करता शासनाच्या विविध योजना शेतक-यांपर्यंत कशा पोहोचतील आणि त्याचा फायदा कसा शेतक-यांना घेता येईल, असे प्रत्यक्ष काम शेतीदूताने करणे गरजेचे आहे.
आजही शेतक-यांसाठी स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना केली गेली तरी शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. फक्त मार्गदर्शन करून चालणार नाही तर त्यांचा उपभोग पण शेतक-यांना घेता आला पाहिजे. त्यासाठी शेतीचा विकास कसा होईल त्यासाठी एकमेव पारंपरिक पद्धत म्हणजे ‘सेंद्रीय शेती’ होय. शेतक-यांमध्ये शेतीविषयक ज्ञानाचा अभाव आणि असंघटितपणामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोटय़ात चालला आहे. त्यामुळे शेतक-यांना खरी गरज आहे ‘सेंद्रीय शेती’ पद्धतीची.

सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे यामुळे पाणी वाफ्यात टिकून राहते. बैल मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्याप्रकारे होते. अशी शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्यास शेती उत्पादन वाढेल आणि खासगी सावकारांच्या दुप्पट व्याजाच्या चक्रातून शेतकरी मुक्त होईल. त्यामुळे सबसीडी देण्याची वेळ शासनावरती येणार नाही. त्यासाठी शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहोचतात काय? त्याचा फायदा शेतक-यांना होतो काय, याचा पाठपुरावा झाला पाहिजे, तरच, शेतक-यांना सुगीचे दिवस येऊन त्यांच्या आत्महत्या रोखता येतील.



5 comments:

Great Visit With Chairman Prakash Patil

Prakash Patil. Tungat.. Pandharpur with Welcoming AGRI Expert Man oj Shaha